हसवणारा पाहिजेच ...



तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर जीवनात आनंदमय क्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पैशाने कितीही श्रीमंत असाल पण आनंद कधीही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत. आनंद होणं हे एक नैसर्गिक वरदान आहे. आनंद हा मानवी आयुष्यातला अनमोल रत्न आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या कुटूंबामध्ये एक तरी हसवणारा व्यक्ती पाहिजेच कारण हा आयुष्याचा महत्त्वाचा व अनमोल भाग आहे. तुम्ही एखादा दिवस उदास झालात तर त्या क्षणी तुम्हाला तेंव्हा सहानुभूतीची व आधाराची अत्यंत आवश्यता असते. त्या क्षणी जर तुम्हाला हसवणारा व आनंद देणारा कोणी भोटला तर तो तुमचा दु:खाचा क्षण क्षणार्धात आनंदाचा नक्कीच करेल. एरवी आपण मनोरंजनाचा भाग म्हणून विनोदी चित्रपट विनोद, विनोदी कथा, विनोदी नाटकं, चित्रपटंव विनोदी कार्यक्रम पाहतो कारण त्याची आपल्याला का गरज आहे आणि हे जर जाणून घ्यायचा असेल तर त्या हसवणार्‍या व्यक्तीला जाऊन विचारा हसवण्यासाठी किती मेहनत व कष्ट लागतात. समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोलाचे योगदान द्यावं लागतं स्वतःला खूप झिजवावं लागतं, प्रचंड मेहनतीच्या जोरावर समाजसेवा सफल होते व श्रेष्ठ ठरते. इतरांना हसण्यासाठी हसवणार्‍या व्यक्तीला त्याग करावा लागतो. महाराष्ट्राच्या मातीत खूप मोठे विनोद वीर कलावंत जन्मले व त्यांच्यामुळे हसण्याचा आनंद द्विगुणीत झाला. एखाद्याला रडवणं जितकं सोप्पं आहे तितकं हसवणं सोपं नाही. त्यामुळे हसवणारा आपल्या आयुष्यात खूप मोठं योगदान देतो याची आपल्याला जाणीव असायला हवी. चेहर्‍यावर एक हास्यमुद्रा आणली तर समोर  प्रचंड रागावलेला लाव्हा सुध्दा पाणी पाणी होतो. एवढी मोठी ताकद हसवणार्‍याकडं आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये कोणतेही हसवणार्‍या व्यक्तीला कधीही तुच्छ वागणूक देऊ नका, कारण त्याच्या मूर्ख कृतीमुळेच आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येतात. आनंद मिळतो, कारण हसणं हा सुद्धा एक शरीराचा व्यायाम आहे व हसण्यामुळे आयुष्य वाढतं असंही म्हणतात त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात हसवणारा पाहिजेच.
-   शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422 
Write to : hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..