भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा, बदलवून टाकू आपुला महाराष्ट्र सारा …
भारतीय
मराठी भोषेतील गझलसम्राट, कवी, महान साहित्यीक तथा पत्रकार श्री सुरेशजी श्रीधर भट यांनी त्यांच्या कवितेच्या ओळीतून मानवतेला खूप
मोठा संदेश दिला आहे. जगातील जेवढे धर्म आहेत त्यापैकी सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवधर्म
आहे. समाज हा विविध अंगानी बनला आहे, एकटा माणूस समाज कधीच होऊ शकत नाही. समाज होण्यासाठी
विचार सम गरजेचे असते व ते असण्याने समाज बनतो. समाजाच्या व्याख्या व समाज म्हणजे परस्परांशी
आंतरकिया करणाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय.
सामाजिक आंतरक्रियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण
झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. जो समाजात वावरतो, ज्याला समाजाची
व्याख्या माहित आहे, ज्याला समाज म्हणजे काय कळतो व ज्या व्यक्तीला सामाजिक व समाजजीवनाची
जाणीव आहे तोच धर्मांच्या पलिकडे जाऊन खरी समाजसेवा करतो. तसेच समाजसेवेचं दर्शन त्याच
व्यक्तीकडून घडते. महाराष्ट्र ही अशी पावनभूमी आहे जिला सर्वश्रेष्ठ संतांचा पदस्पर्श
झालेला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच महाराष्ट्राच्या मातीत अनेक
महापुरूषांनी जन्म घेतला व त्यांनी केलेल्या प्रेरणादायी कार्यामुळे आज जगाच्या नकाशावर
महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव उंचावले आहे व नावलौकिक झाला आहे. इतिहास साक्षीला आहे
म्हणूनच आज मानवजात स्थिर आहे. इतिहासाची जाणीव डोळयासमोर ठेऊन त्याच्या अनुभवाच्या
पाऊलखुणांच्या बरोबरीने मार्गस्थ होऊन मानव पिढीचे जीवन आज सुजलाम सुफलाम झाले आहे.
देशावर इंग्रजांचे राज्य होते, देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या
प्राणांची आहुती दिली. कित्येक क्रांतीकारक शहीद झाले. त्यामुळे आज आपण चार भिंतीच्या
आत सुखरूप आपले जीवन व्यतीत करत आहोत. त्यामुळे माणुसकी ही माणसाणं जपली पाहिजे. चार
भिंतीच्या आत आपण सुखाचे घास खात असलो तरी ते चार सुखाचे घास आपल्या पदरात मिळाले त्यामागील
पाश्वभूमीची आपण जाणीव ठेवली पाहिजे. भाकरीचा तुकडा हातात घेताना त्या बळीराजाचेसुध्दा
आभार मनायला हवेत. हे मानवधर्माचे तत्व आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भुकेल्या व्यक्तींचा
विचार सर्वांनी करायला हवा. भुकेल्यास भाकर मिळाली पाहिजे, अनेक कष्टकरी, मजुरवर्ग,
शेतकरी वर्ग अतिशय हालाखीची परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. महिन्यातला एक दिवस
तुम्ही आम्ही सर्वांनी भुकेल्यांना भाकर देण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जेंव्हा आत्मा
पोटभर जेवण केल्यानंतर तृप्त होतो व त्यापासून आशिर्वाद मिळतो ते समाधान जगाच्या पाठीवर
कुठेही मिळत नाही. आपल्याकडं असणाऱ्या शंभर टक्के हिस्स्यां पैकी शेतकरी जसा एक टक्का
हिस्सा चिमणी पाखरांना आपलं पिकरुपानं देतो त्याप्रमाणे आपणसुध्दा वागलं पाहिजे. आज
वाईट वेळ एखाद्या व्यक्तीवर असेल उद्या दिवस तुमचा असेल कदाचित, कारण वेळ प्रयेकावर
येते, एकमेकांची गरज समाजात सर्वांना असते, त्यामुळे समाजिक जाणीव ठेऊन इतरांना मदत
केली पाहिजे. श्रीमंतीचा, पैशांचा गर्व बाजूला ठेवला पाहिजे, कारण मरावे परि किर्ती
रुपी उरावे असं म्हणतात व हे सत्य आहे. मृत्यूनंतर आपण कमावलेला पैसा, मालमत्ता कोणीही
सोबत बरोबर घेऊन जाणार नाही, त्यामुळं आयुष्यभर माझं माझं करणं आता सोडून द्या, आपलं
म्हणायला शिका, कोरानाने दोन वर्षामध्ये खूप काही शिकवलं आहे. माणसाला जगण्यासाठी दोन
वेळचं जेवण, रहायला छोटासा निवारा व दोन कपडे याशिवाय माणसाचं जीवन दुसरं काही असुच
शकत नाही. त्यामुळे गर्व बाजुला सारून एकमेकांना मदत करायला शिका, एकमेकांना समजून
घ्या व तशा प्रकारे समाजात इतरांनाही सामाजिकतेची जाणीव करुन द्या. कारण सकरात्मक जनजागृती
इट्स मोस्ट इंपॉर्टंट पार्ट ऑफ इन द लाईफ. आपल्याजवळ जर मुबलक प्रमाणात पैसा असेल तर
गोरगरीब झोपडपट्टीमध्ये उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता राहतात त्यांच्यासाठी दानशुरांनी
चांगल्या घरामध्ये राहण्याची सोय करायला हवी. त्यामुळं आपल्या राज्याचं देशाचं नाव
उंचावेल व हे एक मात्र पुण्याचं काम आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज नेहमीच सांगत आलेत
की, देव माणसांत शोधा देऊळात नाही. कोरोना काळात कंबरेवर हात ठेऊन विठ्ठलरुपी कर्तव्यदक्ष
पोलीस, डॉक्टर, नर्स, अँबुलंस कर्मचारी, इतर वैद्यकीय कर्मचारी हेच सर्वांच्या मदतीला
आहे, जीवंत देवाचे रुप त्यांच्यात पाहिले व देवाचं दर्शन घडलं. त्यामुळे कवी सुरेश
भट यांच्या कवितेच्या ओळी खऱ्या आहेत, भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा, बदलवून टाकू
आपुला महाराष्ट्र सारा …
- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422
Write to : hr.shankarchavan@gmail.com
कटू सत्य, भेदक व मार्मिक आहे..🙏🏻🙏🏻
ReplyDelete