सायबर गुन्हेगारी फोफावली …
ऑनलाईन फसवणुकीचा कहर झाला आहे. सायबर गुन्हेगारी एवढया मोठया प्रमाणत फोफावली आहे की, त्याला आळा घालण्यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची गरज सध्या भारताला आहे. संगणक क्षेत्रात क्रांती झाल्यापासून ते आजपर्यंत संगणक क्षेत्रात अमुलाग्र मोठे बदल झाले व पुढेही होतीलच. पण व्हायरस, फिशींग यां सारख्या फसवणुक व नुकसान करणार्या गोष्टींचा जो कलंक संगणक क्षेत्राला लागला आहे आणि तो पुसण्यासाठी आता प्रशासनाला जनहित लक्षात घेऊन खुप मोठया प्रमाणावर जोर लावावा लागणार आहे. हे आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. एक अशी घटना घडली होती की, एका अल्वयीन मुलीकडे तिच्या मामाचा मोबाईल फोन होता व तिला एक फोन आला व मोबाईलच्या माध्यमातून मामाची खुप मोठी फसवणुकी झाली आहे व याबाबत सायबर तज्ञांना सांगण्यात आलं की, माझ्या भाच्चीला काल एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला व तिला लॉटरी लागल्याचं सांगून कोटयावधी रुपये आता तुम्हाला मिळणास असंही सांगण्यात आलं, पण त्या अल्पवयीन मुलीला फसवणुकीबाबत कसलाही गंध नव्हता. त्याबाबत तीला कसल्याही प्रकारचे ज्ञान नव्हते ही गोष्टी तिने तिच्या मामाला सांगितली की, मला मोबाईलवर कोटयावधी रुपये मिळणार आहेत व मामा आपल्याला आता लॉटरी लागली आहे. फुकट पैसा मिळत असेल तर तो कोणाला नको आहेत, जीवनात मोह हे सर्वात वाईट व्यसन आहे आणि एकदा का हे व्यसन जडले की संपलंच मग सगळं आयुष्य. लॉटरी लागल्याचं सांगितल्यास मामा तर हवेतच, त्यानंतर मामा म्हणाला आता पैसे कसे मिळणार आपल्याला. भाचीने मामाला सांगितले की, मला लॉटरी लागल्याचा एक मेसेज आला व त्यानंतर एका व्यक्तीचा फोन आला होता, तुम्हाला जर लॉटरीचे पैसे हवे असतील तर अमुक अमुक एवढी रक्कम टॅक्स म्हणून तुम्हाला आमच्या खात्यावर पाठवावी लागेल. क्षणाचाही विलंब न करता व कसलाही विचार न करता मामाने भाचीला साठ हजार रुपये अनोळखी खात्यामध्ये भरण्यासाठी दिले व तिकडून पुन्हा फोन आला व बारा हजार रुपये आणखी भरावे लागतील असे सांगण्यात आले. परंतू मामाला थोडी शंका आल्यामुळे त्यांने संगणक तज्ञ व सायबर तज्ञ यांना फोन केले व घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती, कारण त्यावेळेला मामाचा मामू होऊन गेला होता, अर्थात मामाची शुध्द फावणुक झाली होती. ऑनलाईन फसवणुकीचे असे अनेक विविध प्रकार आहेत परंतु हा त्यातलाच एक प्रकार आहे. क्रेडीट कार्ड, डेबीड कार्ड, आधार ओटीपी, इंटरनेट बँकीग ओटीपी, विविध अॅपच्या माध्यमातून आपल्या खात्यावरील रक्कम लंपास करणारे सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांची मोठया प्रमाणात लुट करत आहेत. त्यामुळे आपल्या मोबाईलवर आलेला कसल्याही प्रकारचा ओटीपी वन टाईम पासवर्ड हा कोणालाही सांगायचा नसतो हे लक्षात असू द्या. जॉब लावतो म्हणून पैसे उकळले जातात आणि ऑनलाईन फसवणुक केली जाते. त्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. हातात मोबाईल आहे म्हणून कसलाही विचार न करता त्याचा वापर कसाही करायचा नसतो. काही गोष्टींना मर्यादा असतात. त्याचं पालन करायचं असतं याचं जरा भान असू दया. देशातील सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मजबूत बांधणी करुन स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. पोलीसांमार्फत सायबर सेल कक्ष देशात आहेत पण त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारी रोखणं सध्या तरी शक्य आहे असं वाटतं आहे, सायबर सेल कुठेतरी कमी पडतोय असं वाटत आहे. सायबर गुन्हा केल्यास त्या गुन्हेगाराला जर वेळीच कठोर शिक्षा मिळाली तर पुन्हा अशा प्रकारचे फुकट पैसे उकळण्याचे धंदे कोणी करणार नाही किंवा त्या वाटेला जाणारही नाही. देशात सायबर गुन्हेगारी खुप मोठया प्रमाणात तळ ठोकून बिनधास्तपणे देशातील लोकांचे बँक खाते रिकामे करत आहेत. या गोष्टीवर संशोधन करुन वेळीच प्रशासनाने निर्णय घेऊन तात्काळ अशा घटनांना निर्बंध घालायला हवेत व सर्वसामान्य जनतेने सुध्दा सतर्क राहून सायबर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी प्रशासनाला होता होईल तेवढे सहकार्य करायला हवे.
- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422
Comments
Post a Comment