Posts

Showing posts from 2021

हसवणारा पाहिजेच ...

Image
तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर जीवनात आनंदमय क्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पैशाने कितीही श्रीमंत असाल पण आनंद कधीही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत. आनंद होणं हे एक नैसर्गिक वरदान आहे. आनंद हा मानवी आयुष्यातला अनमोल रत्न आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या कुटूंबामध्ये एक तरी हसवणारा व्यक्ती पाहिजेच कारण हा आयुष्याचा महत्त्वाचा व अनमोल भाग आहे. तुम्ही एखादा दिवस उदास झालात तर त्या क्षणी तुम्हाला तेंव्हा सहानुभूतीची व आधाराची अत्यंत आवश्यता असते. त्या क्षणी जर तुम्हाला हसवणारा व आनंद देणारा कोणी भोटला तर तो तुमचा दु:खाचा क्षण क्षणार्धात आनंदाचा नक्कीच करेल. एरवी आपण मनोरंजनाचा भाग म्हणून विनोदी चित्रपट विनोद, विनोदी कथा, विनोदी नाटकं, चित्रपटंव विनोदी कार्यक्रम पाहतो कारण त्याची आपल्याला का गरज आहे आणि हे जर जाणून घ्यायचा असेल तर त्या हसवणार्‍या व्यक्तीला जाऊन विचारा हसवण्यासाठी किती मेहनत व कष्ट लागतात. समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोलाचे योगदान द्यावं लागतं स्वतःला खूप झिजवावं लागतं, प्रचंड मेहनतीच्या जोरावर समाजसेवा सफल होते व श्रेष्ठ ठरते. इतरांना हसण्यासाठी हसवणार्‍या व्यक्त...

कंट्रोल झेड इज नेव्हर इन आवर लाईफ ...

Image
  कंट्रोल झेड ही क्रिया संगणकाशी निगडीत आहे. त्यामुळं ती समजून घेणं महत्वाचं आहे. कंट्रोल झेड ही एक कॉम्प्युटरवर दैनंदिन कामकाज करतांना वापरली  जाणारी शॉर्टकट की आहे अर्थात काम करत असतांना एखादी क्रिया आपल्याला नको असेल किंवा एखादी झालेली चूक, क्रिया पूर्ववत करण्यासाठी या कीज चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे संगणकावर केलेल्या कामात अचूकता येते. ही की, Undo या सुवीधेचे संक्षिप्त रुप आहे. तुम्ही कधीही जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात अशा चुका करु नका की, त्याला Undo हे ऑप्शन अर्थात कंट्रोल झेड नसणार आहे. आयुष्याच्या पायर्‍या चढत असतांना कधीही मागे वळुन पाहू नका. इतिहासाच्या अभ्यास करतांना मागे वळुन जरुर पहा कारण आयुष्याच्या पायर्‍या ह्या जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत चढयच्याच असतात व इतिहासाचा अभ्यास करतांना अनुभवाच्या जोरावर आपलं जीवन जगायला शिकायचं असतं. प्रत्येकजण आयुष्यामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. अर्थात माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण हे सर्व काही होणं जीवनात एकदाच असणार आहे. जसं निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच पर...

‘घरबसल्या कमवा’ चं पेटलं रानं, अन् सोशल मिडीयावर उधाणं आलंया तुमच्या खिशाला कात्री लावाया, चोरटं आलंया !

Image
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच अनेकांचा कल हा आपल्याला पटकन कुठंतरी काम मिळेल अशी आशा बाळगुन असतो व ताबडतोब स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधमोहिम सुरु करतो. एरवी तरुण वर्ग घरबसल्या काही ना काही पार्ट टाईम जॉब मिळवण्याच्या धडपडीत नेहमीच असतो. ऑनलाईन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरबसल्या प्रत्येकजण काही तरी काम मिळवून त्यातून पैसा कमवण्याचा अनेकांचा त्याकडे ओघ तर असतोच शिवाय त्याप्रमाणे प्रयत्नशिलही असतो. एक्ट्रा इनकम कोणाला नको आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पैसा जेवढा जास्त कमवता येईल तेवढा कमवावा असा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ऑनलाईन शोधमोहिम सुरु केल्यानंतर अनेक सोशल मिडीयावर अनेक फसव्या जाहिराती असतात व काही खर्‍या जाहिराती असतात. आता हया खर्‍या आणि फसव्या कशा ओळखायच्या हा सर्वांसमोर खुप मोठा पेच आहे. सोशल मिडीयावर ऑनलाईन पैशांवर डल्ला मारणारी टोळी न...

जन्मतः कोणीही गुन्हेगार नसतो ...

Image
  एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला की, मानसिक विचारांमुळे त्याचे विचारपरिवर्तन होते व माणूस गुन्हेगारी क्षेत्राकडे आपोआप खेचला जातो. विनाकारण एखाद्या व्यक्तीला जर त्रास झाला तर तो आपोआपच गुन्हेगार बनला जातो. समाजामध्ये काही विकृत विचारांची धारणा असलेले लोक असतात त्यांच्या हातून गुन्हा घडतो व ते स्वत: गुन्हा करतात तेव्हा त्यांनी गुन्हेगारी करून आपली उपजीविका उदरनिर्वाह करण्याचे स्वतः ठरवलेले असते. अशा प्रकारचे गुन्हेगार हे वेगळ्या स्वरूपाचे असतात त्यामुळे विनाकारण अन्याय झालेल्या गुन्हेगार व स्वतःहून गुन्हेगारी क्षेत्राकडे गेलेल्या गुन्हेगारांमध्ये फरक आहे. आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्यापासून इतर कोणाचे नुकसान तर होत नाही ना असा विचार केला पाहिजे कारण हासुद्धा भाग अनेकांना गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य केले तर आपल्यामुळे एखाद्यावर अन्याय झाला नाही तर आपले जीवन सार्थकी झाले असे समजावे. नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट. आपलं काम नाण्याच्या कोणत्या बाजूने चाल...

बलात्कारांचा कहरच कहर ...

Image
आज दोन घटना समोर आल्या, एक मुंबईत बलात्कार झाला आणि दुसरीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोन बलात्काराच्या घटना घडल्या या बालात्काराच्या घटना अतिशय भयंकर होत्या. सदर घटना माणुसकीला काळीमा फ ासणार्‍या आहेत. अमानुषपणे केले जाणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले या घटनेचा विसर पडला नाही तोवरच दुसरी बलात्काराची धक्कादायक घटना घडते. हे किती दुर्देव आहे. नराधमांनी सहा वर्षाच्य चिमुकलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यात रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेवून तिच्यावर सामुहीक अत्याचार झाला. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा विचित्र व धक्कादायक प्रकार घडला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. एका तीस वर्षीय पीडीतेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवला. र्‍ह्दय पिळवटून टाकणारी अशी ही घटना साकीनाका परिसर मुंबई याठिकाणी घडली. राज्यात महिला तर सुरक्षित नाहीतच. बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात व देशात वासनांध व व्यसनांध झालेल्या नाराधमांकडून बलात्काांच्या अपराधाचे सत्र  कमी होतांना दिसून येत नाही. माणुसक...

इथं बलात्कारांचा कहर झालाय, अन् देवा तू सांग ना कुठं गेला हरवुनी ...

Image
  सार्‍या जगात बलात्काराच्या गुन्ह्यांनी उच्चांक गाठला आहे, त्यात आपला भारत देश सुध्दा मागे नाही. सन 2019 च्या अहवालानुसार देशात 32033 बलात्काराच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद झाली. सन 2019 मध्ये भारतात दर 16 मिनिटांनी बलात्काराची नोंद झाली. त्यात महाराष्ट्रामध्ये 2299 गुन्ह्यांनी नोंद आहे, तसेच देशामध्ये 18 वर्षे वयावरील 27093 गुन्हयांची नोंद आहे व 18 वर्षाच्या खाली वय असणार्‍यांमध्ये 4940 बलात्कारांच्या गुन्हयांची नोंद भारतामध्ये आहे. ही फक्त पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचा अहवाल आहे, यामध्ये गुन्हे नोंद न झालेले, न होऊ दिलेले यांची नोंद अजिबात नाही. हा बलात्काराचा कहरच. विचार करा देशात दर 16 मिनीटाला एक बलात्कार होत असेल तर ही बाब किती गंभीर स्वरुपाची आहे याचा विचार करायला हवा. स्त्रीयांचं किती मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत असेल. त्यांच्यावर किती मोठया प्रमाणात अत्याचार होत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुध्दा मोठया प्रमाणात महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. देशाच्या राजधानीतच महिला सुरक्षीत नसलीत तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल जरा विचार करा. अल्...

भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा, बदलवून टाकू आपुला महाराष्ट्र सारा …

Image
भारतीय मराठी भोषेतील गझलसम्राट, कवी, महान साहित्यीक तथा पत्रकार श्री सुरेशजी श्रीधर भट   यांनी त्यांच्या ‍कवितेच्या ओळीतून मानवतेला खूप मोठा संदेश दिला आहे. जगातील जेवढे धर्म आहेत त्यापैकी सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवधर्म आहे. समाज हा विविध अंगानी बनला आहे, एकटा माणूस समाज कधीच होऊ शकत नाही. समाज होण्यासाठी विचार सम गरजेचे असते व ते असण्याने समाज बनतो. समाजाच्या व्याख्या व समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया करणाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरक्रियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. जो समाजात वावरतो, ज्याला समाजाची व्याख्या माहित आहे, ज्याला समाज म्हणजे काय कळतो व ज्या व्यक्तीला सामाजिक व समाजजीवनाची जाणीव आहे तोच धर्मांच्या पलिकडे जाऊन खरी समाजसेवा करतो. तसेच समाजसेवेचं दर्शन त्याच व्यक्तीकडून घडते. महाराष्ट्र ही अशी पावनभूमी आहे जिला सर्वश्रेष्ठ संतांचा पदस्पर्श झालेला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच महाराष्ट्राच्या मातीत अनेक महापुरूषांनी जन...

बील गेट्स म्हणतात …

Image
जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स यांचा संगणक क्षेत्राच्या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. जगात यशस्वी असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोज ही ऑरेटींग सिस्टीम साऱ्या जगातील संगणक प्रणालीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वांनाच उपयुक्त ठरली आहे. अनेकांनी कोटयावधी पैसा या माध्यमातून कमावला आहे. 'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश होत आला आहे. इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. अमेरिका मधील न्यू मेक्सीको मध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्यालय स्थित आहे. बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी यांनी सामाजिक जाणीवेतून एका एनजीओ सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यामातून गोरगरीब कष्टकऱ्यांना मदतीचा हात म्हणून समाजसेवा हा भला माणूस करतोय ही अत्यंक कौतुकास्पद गोष्ट आहे. बील गेट्स यांच्याकडून नवतरुणांना शिकण्यासाठी प्रेरणादायी खुप मोलाच्या गोष्टी आहेत. ते म्हणतात   “जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यामध्ये तुमचा कसल्याही प्रकारचा दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो...

खूप चांगली पुस्तकं वाचा ...

Image
तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्याजवळ विचार असायला हवेत. केवळ विचार असुन चालत नाही तर ते चांगले विचार असायला हवेत म्हणून केवळ चांगले विचार चांगली पुस्तकंच देवू शकतात. त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही आयुष्यात खूप चांगली पुस्तकं वाचा. वाचन केल्यानं विचार सशक्त होतात व कसल्याही संकटावर मात करण्यासाठी पुस्तकांचा आधार मोलाचा ठरतो. आपल्या देशाला एक वरदान असं आहे की, आपल्या देशात खुप थोर विचारवंत आहेत त्यांनी लिहिलेले साहित्य दर्जेदार असून त्यांनी त्यांचा त्यामध्ये अनुभव रेखाटन केला आहे. तुम्हाला नक्कीच तुमच्या  जीवनात त्यांनी लिहिलेल्या दर्जेदार साहित्याचा अस्वाद घेता तर येईलच शिवाय जीवनाच्या वाटेलवर काटेरुपी येणार्‍या संकटांवर मात देखील करता येईल. चांगली पुस्तकं चांगली माणसं घडवतात. व्यक्तीमधील राग, द्वेष, मत्सर याचे प्रमाण लोप पावते. चांगली पुस्तकं चांगली पिढी घडवण्यासाठी मदत करतात. चांगली पुस्तकं जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. क्षेत्र कोणतंही असो अभ्यास महत्वाचा असतो. अभ्यास कोणाता योग्य तेही पुस्तकांच्या माध्यमातून समजते. इतिहास वाचल्याशिवाय भाविष्याच्या अंधारात चालणं ख...

सायबर गुन्हेगारी फोफावली …

Image
ऑनलाईन फसवणुकीचा कहर झाला आहे. सायबर गुन्हेगारी एवढया मोठया प्रमाणत फोफावली आहे की, त्याला आळा घालण्यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची गरज सध्या भारताला आहे. संगणक क्षेत्रात क्रांती झाल्यापासून ते आजपर्यंत संगणक क्षेत्रात अमुलाग्र मोठे बदल झाले व पुढेही होतीलच. पण व्हायरस, फिशींग यां सारख्या फसवणुक व नुकसान करणार्‍या गोष्टींचा जो कलंक संगणक क्षेत्राला लागला आहे आणि तो पुसण्यासाठी आता प्रशासनाला जनहित लक्षात घेऊन खुप मोठया प्रमाणावर जोर लावावा लागणार आहे. हे आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. एक अशी घटना घडली होती की, एका अल्वयीन मुलीकडे तिच्या मामाचा मोबाईल फोन होता व तिला एक फोन आला व मोबाईलच्या माध्यमातून मामाची खुप मोठी फसवणुकी झाली आहे व याबाबत सायबर तज्ञांना सांगण्यात आलं की, माझ्या भाच्चीला काल एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला व तिला लॉटरी लागल्याचं सांगून कोटयावधी रुपये आता तुम्हाला मिळणास असंही सांगण्यात आलं, पण त्या अल्पवयीन मुलीला फसवणुकीबाबत कसलाही गंध नव्हता. त्याबाबत तीला कसल्याही प्रकारचे ज्ञान नव्हते ही गोष्टी तिने तिच्या मामाला सांगितली की, मला मोबाईलवर कोटयावधी रुपये मिळणार आहेत ...

वाचकांच्या शोधात ...

Image
भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण देश डिजीटल झाला. आता माहितीची देवाणघेवाण करणं अगदी काही सेकंदामध्ये पूर्ण होत असल्याने ही मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये मोठया प्रमाणात अमुलाग्र बदल होतांना दिसत आहे. विज्ञानाची कास धरुन डिजीटल क्षेत्रात मोठी क्रांती झाली. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पूर्वीपासूनच चहासोबत वर्तमानपत्र वाचण्याची चांगली सवय भारतीयांना आहे. सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा दिनक्रम आजही अनेकांचा आहे. परंतू हातामध्ये स्मार्टफोन आल्यामुळे आजच्या पिढीला वाचण्याची आवड व सवड या दोन्ही गोष्टींचा लोप पावल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. फक्त दृक-श्राव्य माध्यमांचा अधिक वापर होऊ लागल्यामुळे वाचनाची सवय मोडली आहे. पुस्तकं माणसाला हुशार बनवतात. वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व वाचन केलेली व्यक्ती ही विचारांनी श्रेष्ठ असते. वाचाल तरच वाचाल, पुस्तकांमुळं माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नसतं असं म्हणतात. पण तरुणाई व्हीडीओ रिलच्या नादी लागल्याने त्यांचा व वाचनाचा संपर्क कायमचा तुटला आ...

बंड करा …

Image
  बंड करा … तुम्ही एखाद्या ठिकाणी कोणत्याही स्तरावर काम करत असाल तर तुम्हाला मानसिक त्रास हा होतोच. हा कृत्रिम मनुष्यनियम झाला आहे.   जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात फास्ट फॉरवर्ड दुनियेत माणुसकी अजिबातच शिल्लक राहिली नाही. जो तो मानसिक तणावात वावरत आहे. ज्याला त्याला मानसिक त्रासामधुन आपले जीवन जगावे लागत आहे. जोतो वरिष्ठांचा, समाजातील विशिष्ठ व वरिष्ठ घटकांच्या दबावाखाली येऊन काम करतो आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रांमधील वाढत्या मानसिक दबावतंत्रामुळे अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्याचं कारण म्हणजे ते समाजामध्ये एडजस्ट झालेच नाही व त्याचा परिणाम म्हणून मरण पत्कारलं. जीवनात काही लोकं तत्वनिष्ठ व स्वाभिमानी असतातात. त्यांना समाजातल्या काही गोष्टी नेहमीच बोचत असतात, खटकत असतात. त्यामुळे अशा घोडयांचा आणि समाजामधील कुविचारी गाढवांसोबत मुळीच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ते बंड करतात व आपला स्वतंत्र रस्ता निवडून समाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक संस्था, कंपन्या, शासकिय कार्यालयं, पक्ष इत्यादी ठिकाणी अनेकांना काम करतांना आपल्या वरिष्ठ...

कोणासाठी काहीतरी करायला हवं !

Image
  कोणासाठी काहीतरी करायला हवं ! भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून प्रत्येकजण वर्तमानकाळात अहोरात्र परिश्रम करत असतो, अनेक संकटांना सामोरे जाऊन दिवसेंदिवस संघर्ष करत असतो, परंतू जीवावर बेतलेल्या कोरोनासारख्या संकटामुळं व एकूणच सर्वच परिस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत होऊनल छिन्न विछीन्न झालं आहे. काय करावं सुचत नाही, जगावर ओढावलेल्या संकटामुळे स्थिती व परिस्थिती एकूणच चिंतन करायला लावणारी बाब बनली आहे. असं असतांनाच तरुण पिढी, व्यापारी, रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे, शेतकरी राजा सर्वच जनता हैराण आहेत. प्रत्येकाच्या घरचं आर्थिक गणित कोलमडलं आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था अनेकांची झाली आहे. एवढं भयान वास्तव असतांना देखील तरुण पिढीसह अनेक हौशी त्या सोशल मिडीयावर व्यंग, अश्लिल, कॉमेडी, स्टंट व्हिडीओ तयार करुन प्रसिध्द करत आहेत व नकोत्या बाबींचा प्रसार व प्रचार करण्यात मग्न आहेत. दिवसाला दिडजीबी इंटरनेट डेटा मिळतोय म्हणून आपण कोण, कुठं चाललोय, आपल्याला जीवनात येऊन काय करायचंय हेच मुळात विसरुन गेले आहेत, फक्त आणि फक्त टाईमपास बस्सं !. जागतीक महामारी कोरोनासारख्या रोगामुळे गेल्या दीड वर्षापासून जी स...

कोरोना एक विदारक वास्तव …

Image
  कोरोना एक विदारक वास्तव … माणूस आयुष्यभर मी पणामध्ये जगतो. पण आजच्या घडीला कोरोनामुळे त्याच्या वाटयाला आता शेवटची अंघोळ सुध्दा नशिबात नाही, शेवटची मिरवणूक नाही, तिरडी नाही, सोबत नातेवाईक नाहीत, नातेवाईकच काय तर स्वत:च्या घरातील सदस्य देखील सोबत नाहीत, एकुणच काय तर मरणाचा सोहळा अंत्यसंस्कार आता कोणालाच साजरा करता येणार नाहीत. मृत्यूनंतर लगेच प्लास्टीक पॅकींग आणि प्रेत सरळ स्मशानभुमीत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार सुध्दा आता विधीप्रमाणे होत नाहीत, कारण तेवढा वेळच कुणाकडे नाही एवढी मृत्यूची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. मृत्यूची वेळ आणि काळ खरंच खूप बदलला आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रेतं जाळण्यासाठी आता लाकडं सुध्दा कमी पडत आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत प्रेतांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेस मृत्यूसंख्या वाढत असल्यामुळे विलंब लागत आहे.   प्रेतं जाळण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दृश्यं उघडया डोळयांनी पहावे लागत आहेत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे शिवाय अलीकडे तर त्याहूनही अधिक विदारक वास्तव चित्र पहावयास मिळालं की, नदीपात्राच्...