बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम
बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम' शेतकऱ्यांना , कामगारांना व सर्वसामान्य भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासनं देऊन गेली पन्नास वर्षे पुढाऱ्यांनी गादया मिळावल्या . विकासाच्या नावचा पत्ताच नाही , निवडणुक जवळ आली की नेतेमंडळीचा शहणपणा जागा होतो . गल्ली बोळांपासून ते झोपडपट्यांपर्यंत पायातली जोडे झिजवुन ही लोकं घर ना घर पिंजून ‘ मतं दया ’ च्या नावाखाली काढतात . निवडुन आल्यानंतर व निवडणुकीपुर्वीची गत म्हणजे निवडणुकीपुर्वी मतं मागायला येणारी पुढारी मंडळी ही तेहतीस कोटी देवांची माता ‘ गाय ’ (Cow) च्या रुपात येतात अन् निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ‘ वाघाच्या ’(Tiger) रुपात प्रवेश होतो . मत मागायला आपलेल्या नेत्यामध्ये जी नम्रता असते ती निवडणुकीत निवडून दिलेल्या नेत्यामध्ये नसते , असते ती फक्त उध्दट डरकाळी . असो , गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्त आठवणी , अशा गोष्टींच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही . आत्ता वेळ आहे ...