‘व्यसन एक फॅशन’


व्यसन एक फॅशन

जीवनात जन्माला आलेल्या प्रत्येकाला हवं असतं निरोगी शरीर. स्वत:चं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी माणूस लाखो रुपये खर्च करुन सुदृढ शरीर कसं बनवता येईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत असतो. व्यसनाची सवय निर्माण होण्यासाठी मित्रांची मैत्रिणींची संगत हे एक कारण पुरेसं आहे. दुसरं म्हणजे घरगुती मानसिक ताण तणावामुळे व्यक्ती व्यसनाच्या आहरी जातो. तर काही शौकीने, फॅशन म्हणून व्यसनाच्या आहरी जातात. पण हल्ली तरुण पिढीमध्ये व्यसन करण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. व्यसन हे एक फॅशन बनलं असल्यामुळं तरुणाई व्यसनाच्या डोहात पार बुडून गेलेली असतांना दिसत आहे. इंजीनिअरींग, एम.बी.. एम.बी.बी.एस, फार्मासी या कॉलीजवयीन तरुण तरुणींमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. कॉलेजवयीन जीवनात लागले व्यसनाची चटक वैवाहिक जीवनानंतरही ती तशीच राहते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत व्यसन करण्याची सवय तशीच राहते. व्यसन करण्याचे बरेच प्रकार तरुण तरुणींमध्ये पहावयास मिळतात. सिगारेट, गुटखा, बिअर, वेगवेगळया प्रकारच्या देशी विदेशी दारु, गांजा, मोठया मोठया मेट्रो शहरांमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण जास्त आहे. धकाधकीच्या जीवनात मुळात मानवी शरीराला पोषक आहार मिळत नाही. त्यात तरुण पिढींमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या शरीराला बाधक ठरते. विविध प्रकारच्या रसायन मिश्रीत पालेभाज्या, चायनिज फूड, चटपटीत मसाल्यांचा अतिवापर व्यसन यामुळे पुरूषांच्या शरीरातील विर्य पातळ होणे, विर्याचे प्रमाण कमी होणे स्त्रीयांनासुध्दा याचा त्रास सहन करावा लागतो. कॉलेजमधील वातावरण हे अत्यंत खेळीमेळीचे असते. नवनवीन प्रदर्शित होणाऱ्या सिनेमातील नायीका नायक यांनी केलेली वेशभुषा ही तरुणाईची एक वेगळया प्रकारची स्टाईल बनून जाते. नायकाने हातात धरलेले ते सिगारेट दारु पिण्याची स्टाईल त्याचीच पुनरावृत्ती एक फॅशन म्हणून, स्टाईल म्हणून युवक कृती करतात. यामधूनच त्यांना ही सवय लागते. मोठमोठया शहरामध्ये मुली सुध्दा व्यसन करण्यात हल्ली मागे नाहीत. पूर्वी मुलगा पहायला आल्यास मुलींची अपेक्षा म्हणजे नवरा निर्व्यंसनी असला पाहिजे असा पण असायचा मात्र हल्ली जीवनाचा जोडीदार हा ऑकेश्नली का होईना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यसनी असला पाहिजे हा आजकालच्या युवतींचा पण असल्याचे दिसते. बिअर, स्मोकिंग या प्रकारच्या व्यसनांमध्ये मुलींचेही प्रमाण सपाटयाने वाढत आहे. आपल्या पालकांच्या नकळत तरुणाई व्यसनाच्या आहरी जाऊन छुप्या ठिकाणी असरा घेऊन व्यसनाला बळी पडतात. तरुण मुली वस्तीगृहात राहणाऱ्यांमध्ये सुध्दा व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण सर्रास छुप्या पध्दतीने चालते. युवकांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी तर बिअर, दारु, सिगारेट हया गोष्टी सक्त्तीच्या असल्यासारख्या ठराविक प्रमाणात आहेत. याअशा प्रकारालाच त्यांनीपार्टीअसं नाव दिलं आहे. पार्टी म्हणजे जेवण खाणं नसून व्यसन करण्याच्या क्रियेला पार्टी असं आजची युवा पिढी समजायला लागलेली आहे. चहाच्या टपरीवर तासन् तास कॉलेज बुडवून बसणारी तरुण पिढी व्यसनामुळे देशाचं नाव स्वतच्या शरीराचं नुकसान करुन घेतांना दिसत आहे. तरुण युवा पिढीनं या व्यसनांबाबात जागरुक राहून स्वत: निर्व्यसनी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतरांना अशा प्रकारचा सल्ला दिला पाहिजे. टी.व्ही. वरसोडाच्या नावाखाली सर्रास दारुच्या ब्रँडच्या जाहिराती केल्या जातात. सर्व सामान्य जनतेच्या डोळयात धूळ टाकून परवानगी देणारं हे सरकार खरंच मगरीसारखं डोळे मिटून बसल्याचं ढोंग करत आहे. सिंगारेटच्या जाहिरातींवरतांबाखुळे कर्मरोग होतोअसा वैधानिक इशारा दिलेला असतो. मात्र हे सरकार त्यावर बंदी आणायची सोडून दिवसेंदिवस परवाने देऊन देशाच्या काळया पैशाच्या खजिन्यामध्ये वाढ करण्याचं काम करत आहे. गुटख्यामुळे कर्करोग होतो असं प्रसारमाध्यमांच्या मार्फत कोठयावधी रुपये खर्च करुन हे भारत सरकार धुम्रपान करुन नका असं सर्वसामान्य जातनेला ओरडून सांगतं आणि दारु, गुटखा, विडी, सिगारेट, ड्रग्स अशा शरीराला घातक असणाऱ्या निकोटीनयुक्त प्रोडोक्टला परवानगीही देतं. याला म्हणताता का समान न्याय ? ही तर सरळ सरळ जनतेची दिशाभूल आहे. पण याविरोधात कोणी आवाज उठवला की त्याची वेगवेगळया मार्गानं तोंडं बंद करण्याचं काम काही भ्रष्ट अधिकारी, समाजकंठक पुढारी नेहमीच करत आले आहेत. तरुण पिढीच जर व्यसनाच्या सागरात पार बुडून जात असेल तर येणाऱ्या काळात देशामध्ये निरोगी असं कोणीच राहणार नाही. देशातील प्रत्येक नागरीकाला कोणता ना कोणता व्यसनांमुळे रोग झालेला असेल. भारत सरकारला व्यसनांपासून तरुण युवा पिढीला खरंच जर दूर करायचं असेल कोटयावधी रुपये जनजागृती करण्यासाठी वापरायचा पैसा वाचवायचा  असेल तर दारु, गुटखा, बिअर,ड्रग्स यावर बंदी आणून परवाने रद्द करायला हवेत. या असल्या व्यसनांमुळे कित्येक घरं उध्दवस्त झाली आहेत. कित्येक कुटूंब रस्त्यावर आली. कित्येक आजाराने मरण पावले. तर कित्येक यासर्व गोष्टींचा त्रास भोगत आहेत. तरुण पिढीवर आलेलं हे संकट म्हणजे देशावर आलेलं संकट आहे. आणि हा अत्यंत संवेदनशिल विषय असल्याने याची गंभीर रित्या दखल सर्वांनीच घ्यायला हवी आणि तरुण युवा पिढीला पडलेलं हे व्यसनाच्या भुरळांपासून सावध करायला हवं. फॅशन म्हणत म्हणत एक दिवस नावापुढे कैलासवासी, वैकुंठवासी लावयाची वेळ येऊ नये. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई जनतेकडून, पालक वर्गाकडून, शासनाकडून अपेक्षीत आहे. प्रयत्न केल्यास मनावर ताबा असल्यास तरुण युवा पिढीतील व्यसनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल सर्वतोपरी सार्थक झाल्यासरखं निश्चितच वाटेल. पालकांनी सुध्दा अशा तरुणाईमध्ये वाढलेल्या व्यसनाच्या फॅशन पध्दतीचा सहनुभूतिपूर्वक विचार करायला हवा. आपला मुलगा मुलगी घराच्या बाहेर पडल्यानंतर खरंच काय काय उदयोग करतात यावर नजर ठेवायला पाहिजे. जेणेकरुन आपल्या पाल्यावर लक्ष केंद्रीत होईल दिवसभरात तो काय करतो याचा आढावा घेता येईल. तसेच शासनाचा जनजागृतीसाठी कोठयावधी होणारा खर्च वाचेल. मागील पंधरावर्षापूर्वी लिहिता वाचता येत नसेल तर आडाणी समाजायचे, मात्र हल्ली व्यसन केल्यास जो व्यक्ती  कोणतंही व्यसन करत नाही त्याला वेडयात काढण्याचं काम इतर तरुण युवा पिढी करत आहेत. अशा प्रकारचं डोक्यात फॅड बसलेल्या तरुणाईमुळं स्वत:वर, समाजावर, त्यांच्या पेक्षा लहान असणाऱ्या युवा वर्गावर याचा वाईट दुष्परीणाम होतो याचे पडसाद दिसू लागतात. त्यामुळे देशातील तरुण युवा पिढीला एकच तळतळीची विनंती आहे. तुम्ही जर व्यसनाच्या आहरी गेला असाल तर त्यावर वेळीच उपायोजना करा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनावर कंट्रोल करुन आजच व्यसनमुक्त व्हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून देशातील प्रत्येक नागरीक हा निरोगी असावा याच्याकडे कल असून दया. जर तुम्ही फॅशन म्हणून व्यसन करता असाल तर याचे वाईट दुष्परीणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर उमटताना दिसतील आरोग्य धोक्यात येईल हे मात्र निश्चित.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !