Posts

प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता !

Image
प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता ! हल्ली प्रिंट मिडयाला टक्कर देण्यासाठी म्हणून का काय सोशल मिडीयाचा जन्म झाला, सोशल मिडयाच्या माध्यमातून घडलेली घटना अगदी तात्काळ जनसामान्यांपर्यंत स्मार्ट फोनच्या माध्यमातून पसरू लागली. अपघाताच्या बातम्या असतील, विविध सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी मुंज, जावळ, वरात लग्न इत्यादी शुभर्कांपासून निधनांच्या बातम्या अगदी काय ?, कुठे, केंव्हा ? वगैरे वगैरे क्षणांत माहिती मिळू लागली, हल्ली सोशल मिडीया हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाशिवाय कोणतेही काम करतांना सर्रास वापर होवू लागल्याने, माहितीची देवाण घेवाण, गप्पा, संदेश अशा सर्व लाभदायक गोष्टी सहज शक्य झाल्या, सोशल मिडीया मानवी जीवनात एक वरदान ठरल्यामुळे डिजीटल युगात जणू क्रांतीच झाली, या नव्या तंत्रज्ञानाचा जन्म झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात कायापालट पहावयास मिळतोय, यामधील काही तंत्रज्ञानाचा वापर हा शैक्षणिक हेतू पोटीसुध्दा होत आहे. ही व अभिमानाची, कौतुकाची व चांगली बाब तर आहेच शिवाय देशाच्या विकासविषयक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा घटकही आहे. असे बरेच  फायदे महत्वं, वैशिष्टये सा...

महाराज, आम्हाला माफ करा ! “छिंदम सुटला” !

Image
महाराज, आम्हाला माफ करा ! “ छिंदम सुटला ” !   खरंच राजे जमलं तर आम्हाला माफ करा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या मुजोर भाजप सत्तेतल्या पिलावळांनी राज्यभरामध्ये हैदोस मांडून ठेवला आहे, ज्या राजानं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला आयुष्य पणाला लावलं, त्या राजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची हिंम्मत करणाऱ्या औलादी राज्यात पैदा होतील असे स्वप्नातही कधी आलं नव्हतं, पण त्याच मातीमध्ये असली किडकी औलाद जन्मला आली व ती आज सुटली यापेक्षा दुसरे कोणतेच दुःख शिवप्रेमी झाले नाही, आजपर्यंत कायदा, सुव्यवस्थेवर, न्यायालयावर शिवप्रेमींचा विश्वास होता. हाच विश्वास आता इतिहासजमा झाला आहे. याचे चिंतन व्यवस्थेला करावेच लागेल. असल्या श्रीपाद छिंदम सारख्या नालायक औलादी हजार पाचशेच्या चिरीमिरी वर व्यवस्थेला नोटांची बंडले दाखवून मोकाट सुटत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांमध्ये अशा निंदनीय घटना पुन्हा पुन्हा घडतच राहतील, छत्रपती शिवरायांनी दिलेल्या बलीदानाला हे प्रशासन, हे शासन हे हाफ चड्डी वाल्यांचं सरकार न्याय देऊ शकत नाही, हे फार मोठे दुर्दैवं आहे, फेब्रुवारी म...

असला माज येतो कुठून ?

Image
असला माज येतो कुठून ? ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वत:चं संपूर्ण आयुष् ‍ वेचलं, ज्यांच्यामुळे आज आपण लोकशाहीमध्ये वावरतो. अशा महापुरूषंबददल अश्लिल भाषा वापरण्याची हिंम्मत होतेच कशी ? हा खुप चिंचेचा विषय आहे. स्वराज्य निर्माते जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबददल अश्लिल भाषेत वक्तव्य करणारा अहमदनगरचा नगरसेवक बडवा श्रीपाद छिंदम मोकाट आणि आपण षंढासारखे मुग गिळून धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करतो ही शोकांतिका आहे या पुरोगामी महाराष्ट्रांची, ही शोकांतिका आहे त्या मातीची जिथं महापुरूषांच्याविचाराने पावन ती पावन झाली. एकीकडे शिवरायांचं जगात सर्वात उंच स्मारक करण्याकडे भाजप सरकार जनतेला व शिवप्रेमींना आश्वासनं देवून कोपराला गुळ लावत आहे व एकीकडे भाजप सत्तेतले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी कानात शिशाचा रस ओतावा , कानालाही न ऐकावे वाटणरे, शिवप्रेमींच्या भावना दुखावनारे वक्तव्य केले. कारण फक्त वैयक्तिक होते. कारण फक्त मर्यादीत होते पण महापुरूषांना यात ओढायचे काय कारण ? एवढा द्वेष का ? याचा खोलवर विचार व्हावा. एवढे मावळे आज शांत का ? ज्या ठिकाणी विचारांच...

मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले

Image
मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार विजेते संपादक बालाजी तोंडे यांच्या कार्याला बीड जिल्हयातील नव्हे तर राज्यभरातील जनता सलाम करत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी असं काही काम केलं आहे की प्रत्येकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय रहात नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण म्हणतो, पण याच सोयऱ्यांची कत्तल राज्यभर दिवसा ढवळ्या सुरू आहे. पण याचं दु:ख निसर्गावर निस्वार्थ प्रेम करणारांनाच कळते. झाडाचे रोपटे लावून त्याच्यासोबत सेल्फी काढून प्रसारमाध्यमातून प्रसिध्दी मिळवणारे मोप मिळतील. पण बालाजी तोंडे यांना निसर्गप्रेमी अवलियाच म्हणावं लागेल.  बीड तसेच राज्यभरात महामार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी हजारोवर्षे जुन्या वृक्षांची कत्तल होत आहे. शासनदरबारी बालाजी तोंडे यांनी वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. बालाजी तोंडे यांच्या मते अफाट वृक्षतोड झालीच तर प्रत्येकाला पाठीवर आक्सीजनचा सिलेंडर घेवून रत्याने चालावे लागेल. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी व झाडे लावण्यासाठी बालाजी तोंडे यांचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत...

कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !

Image
कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !  स्वच्छ भारत मिशन च्या नावाने भारत सरकारने देश स्वच्छ होण्याचे धडे गिरवण्याचे काम शिपायांपासून ते वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांपर्यंत दिले व स्वच्छ भारत मिशन ही सक्तीची योजना केली.परंतू शेवटी भारत देश हा अस्वच्छच दिसतोय सर्वत्र. मागील काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून एक विदेशी जोडप्यांचा फोटो प्रसिध्द झालेला सोशल मिडीयावर पाहितला. तो फोटो बरंच काही आपल्या देशातीत जनतेला शिकवण करुन देणारा होता. त्या फ फोटोमध्ये एका व्यक्तीने सिगारेट ओढल्यानंतर उरलेला तुकडा इतरत्र न टाकता आपल्या बॅगमध्ये टाकला, तेथीलच जवळ असलेल्या भारतीय व्यक्तीने हे कृत्य पहात होता, न राहून त्याने विचारले, असे का केले ? त्या विदेशी पर्यटकाने जे उत्तर दिले खरंच आश्चर्यकारक होते ! देश घाण करण्यात जे जे सहभागी आहेत अर्थात आपण सर्वचजण त्यांनाही लाज वाटेल असेच होते. ते विदेशी पर्यटक म्हणाले, की मी हा कचरा इथे टाकला तर मलाही माझ्या मायदेशी गेल्यावर अशीच सवय लागेल आणि आमच्या देशामध्ये असे कृत्य करणारास भारतीय रक्कमेप्रमाणे जवळपास पंधरा हजार रुपये दंड ठोठावतात. बघा हा देश,...

ही 'सेल्फी' आणखी किती बळी घेणार ?

Image
ही ' सेल्फी '  आणखी किती बळी घेणार ? तंत्रज्ञान विकसीत झाले, आपला वावर डिजीटल युगात झाला त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला व ज्ञानाची पावर वाढली. कधी काळी रोलचा कॅमेला असायचा, त्यात निगेटीव्ह फि ल्म रोज टाकून तो रोल संपल्यासच फोटो धुवून अर्थात डेव्हलप करुन मिळायचा, फोटो काढणे ही पध्दत दुर्मीळच. मोजक्याच, आवश्यक अशाच कार्यक्रम प्रसंगी क्वचितच ही पध्दत वापरली जायची. कालांतराने दिवसेंदिवस जग प्रगतीकडे जातंय म्हटल्यावर सोयी सुविधा हया सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मोबाईलयुगाची निर्मिती झाली. फोटो कॅमेऱ्यांच्या सुध्दा जडणघडणीत अमुलाग्र बदल घडून आला, आता पाच हजारांपासून ते पन्नास लाखांपर्यंतचे फोटो काढण्यासाठी विविध रंगाचे अन ढंगाचे कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यात भर पडली ती मोबाईमध्ये फोटो कॅमेरा आला. हा बदल फोटोग्राफी क्षेत्राला मागे सरकवणारा ठरला व तो यशस्वी झाला. कधी काळी फ ोटो काढायचा म्हटलं तर प्रोफेश्नल कॅमेरामनच फोटो काढायला यायचां. पण आता त्यांची तेवढी गरज उरली नाही, हा बदल व तो मान आता स्मार्ट फोनने हिसकावून घेतला आहे. पण कॅमेऱ्यातील जीवंतपणा व तशी कला आत्ताच्या ...

हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ?

Image
हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ? महिलांना चुल अन मुल शिवाय आजच्या युगात फ क्त नावालाच आरक्षण अन संरक्षण आहे. केवळ महिलांना आम्ही पुरूष वर्ग तिला पुरूषासमान वागणुक देतो असं भासवतात. मात्र तिला ना आरक्षण आहे ना संरक्षण, गेल्या कित्येक वर्ष झालं बलात्काराचं प्रमाण देशात काही कमी होता होत नाही. ही कीड निघून जाण्याचं नाव घेत नाही. तेंव्हा आपण महापुरूषांचे व्याख्यानं जनजागृती साठी, परिवर्तनासाठी, क्रांती घडवण्यासाठी, चांगल्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी विचार आत्मसात करतो. परंतु त्यांचे विचार खरंच आत्मसात होवून त्याप्रमाणे आपण स्वत: अनुकरून करतो का ? तर बिलकुलच नाही असे लक्षात येते. स्त्रीयांना समानतेची वागणुक मिळावी यासाठी महापुरूषांनी त्यांच्या साहित्य विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी जीवाचं रान केलं पण आपणा आजही त्यांच्या त्या विचारांना मान्य करायला तयार नाहीत. क्वचीत एखादा अपवाद वगळता. आजही स्त्रीयांना शिवजयंती (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगळता) किंवा अन्य जयंती निमित्त मिरवणुक असो वा विविध कार्यक्रम महिलांना घरातच ठेवण्याची प्रथा बहुतेक ठिकाणी चालते....

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

Image
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ... हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो. असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्या...

वाघीणीचं दुध ! ...

Image
वाघीणीचं दुध ! ... भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की, शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे ते पिल्यास प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ते खरंच आहे. ज्ञानामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की, माहितीच्या आधारे शिक्षण घेणारे त्या त्या क्षेत्रामध्ये आपली शिखरं गाठतातच. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फु ले यांनी व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडी करुन दिली. शिक्षणाचं महत्वं आपल्याला त्यांनी सांगितलं व शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं हे त्यांचं योगदान, त्यांनी केलेला त्याग हे सर्व आपण लक्षात घेतलं पहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण व्यवस्था ही जशी असायला पाहिजे तशी आपल्याला मिळते का ? आपण घेत असलेलं शिक्षण हे त्या व्यवस्थेतलं आहे का? आपण काय शिकलो ? त्याची गुणवत्ता तेवढी आहे का ? जेवढी आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरायचं आहे म्हणजेच आपल्याला आपली शिखरं गाठायची आहेत. हल्ली तर शिक्षण पध्दतीचा बाजार मांडून ठेवलाय. शिक्षणव्यवस्था ही पार कोलमडली असून त्याचं बाजारी करण झालंय. आपल्या पाल्याला भ...

तरुणांना रोजगार हवाय ! ...

Image
तरुणांना रोजगार हवाय ! ... देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सामाजिक जबाबदारी असते. देशात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध असतील तर तरुणांवर आधारित देशाच्या भावी वाटचालीसाठी सर्वच दृष्टीने महत्वाची बाब आहे. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांना त्यात आपल्या देशाला बेरोजगारीची कीड लागली असल्याचे समजते. तरुणांमध्ये शिक्षण उच्च दर्जाचे असावे याकडे जास्तीचा कल असल्यामुळे या देशात गरीबातला गरीब सुध्दा अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेवून नौकरी मिळवण्यासाठी त्याच्यासह संपूर्ण परिवार धडपड करत आहे. पण देशात सरकार कोणाचेही असो तरुणांना फ क्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनाचे लाल गाजर आत्तापर्यंत दाखवण्यात आले आहे. खाजगी नौकरी क्षेत्रामध्ये नौकरीची हमी अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे खाजगी नौकरी करणं पुढील वाटचालीसाठी हवं तेवढं परिणामकारक ठरत नाही. त्यात सरकारी नौकरीमध्ये कपात करण्याचा फ तवा सत्ताधाऱ्यांनी काढल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सुर वाढला आहे. तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च लक्षात घेता नौकऱ्यांचे प्रमाण व मिळणारा पगार...

चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...

Image
चला पत्रकारितेवर बोलू काही ! ... रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्‍न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय सम...

राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ...

Image
राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ... महाराष्ट्र राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या गंभीर विषयाला राज्य मंत्रिमंडळामध्ये व शासन दरबारी वाचा फोडायला कोणीच तयार होताना दिसत नाही. दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वसामान्य जनता, निर्दोष बालके यांची हत्याकांडं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या अपघातांवर तोडगा काढायचा कधी ? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. अपघात कशामुळे होतात ? त्याची कारणं काय आहेत ? या विषयाकडे जरा स्वतःचा प्रश्न असल्याप्रमाणे पाहिल्यास तोडगा नक्कीच निघेल व अपघातांचे प्रमाण आपोआप कमी होण्यास नक्कीच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.  राज्याचे परिवहन मंत्री आश्वासनांचं नेहमीच गाजर देतात. त्यांना कोणी फोन केल्यास ते सांगतात अपघात कमी करण्यासाठी आम्ही आमचे वतीने सर्व प्रयत्न करत आहोत असे बोलण्यात येते, त्यात वाहतूक प्रशासन हेसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. हल्ली तर राज्य परिवहन मंडळाच्या बस यांच्या अपघाताचा आलेख उच्च स्तरावर आहे. बसचा अपघात होण्याची कारणे पाहिली असता सध्याचे बस चालक हे तरुण वयातील असल्यामुळे भरधाव बस चालवणे, ओव्हरटेक ...

माणुसकी हरवलेला माणुस ...

Image
माणुसकी हरवलेला माणुस ... माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो . त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते . समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच . या मेंदूचे लक्ष सकारात्मक व नकारात्मक आहे हे कळते . काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज - वजाबाकी होतेच , परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो . या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच . स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते . आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय . आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते . अर्थात पोलिस यंत्रणा . मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान ...