Posts

Showing posts from 2020

देश डिजिटल झाला पण शासकीय कार्यालयं मात्र जैसे थे!

  देश डिजिटल झाला पण  शासकीय कार्यालयं  मात्र जैसे थे!   अवघड कामे सोपे व्हावी म्हणून संगणक प्रणाली आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये वापरत असतो. गणित असो वा विज्ञान तसेच मोठ्यात मोठी आकडेमोड असो अथवा गुंतागुंतीची कामं असो संगणक प्रणालीचा वापर करून अगदी सहज व सोप्या पद्धतीने कामं अगदी सुलभतेनं करता येतात. म्हणूनच देशाचे पंतप्रधान यांनी डिजिटल इंडिया चे स्वप्न पाहिलं व ते साकार करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने संपूर्ण देशात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी जनतेला आवाहन केले. जग स्मार्टफोनमुळे जवळपास डिजिटल झालंच आहे. देशात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक अवघड कामे सोपी झाली आहेत. डिजिटल इंडियामुळे  जवळपास बँकिंग व्यवहार, माहितीची देवाण-घेवाण, ऑनलाईन बैठका, जनसंवाद इत्यादी काम अत्यंत जलद गतीने होत असतांना दिसत आहेत. ब्रिटिशांनी भारत देशामध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून त्यांनी अनेक नियम अटी त्यांचे सोयीचे कायदे तयार करून ठेवले.  आपल्या देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षे पूर्ण झाली तरीही हा देश मानसिक रित्या गुलामगिरीत जगतोय असं म्हटल...

दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

Image
दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …  pic source by : google.com इथं प्रत्येकजण मोबाईलच्याच भाषेत बोलतोय ! म्हणलं बुवा आपण पण थोडंसं बोलूयात म्हणून आज जवळ जवळ शालजोडे हाणायचा ईचार आला अन मग केलं सुरु, तर त्याचं असंय की, दीड जीबी इंटरनेटचा डेटापॅक एका दिवसात दिवाळीचं रॉकेट उडवावं तसं संपवणारी तरुण मंडळी अर्थात लंबे रेस के घोडे अर्थात देशाचा मजबूत असा भक्कम  पाया अर्थात उदयाचा भारत देश वगैरे वगैरे.  महिना असो अथवा तीन महिने असोत अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन व त्यात दीड जीबीचा डेटा पॅक हया नवतरुण मंडींसह सर्वांच्याच मुलभूत गरजा बनल्या आहेत. इथं प्रत्येकाकडं मोबाईमध्ये दीड जीबी डेटापॅक असतोच व त्या मोबाईलवरच्या त्या टचपॅडवर अंगठा खाली वर सरकतांना कधी दिवस उगवला अन कधी मावळला याची जराशीही चाहूल तरुण मंडळींना आजकाल लागत नाही. त्या टाईमपासच्या नादात वडीलधाऱ्यांनी सांगितलेली कामं सुध्दा रेंगाळली जातात. तसेच जीवनात अमुलाग्र असा नको तो बदल हया दीड जीबी च्या पॅकनं समाजात करुन ठेवला आहे. कधी काळी इंटरनेचा वापर हा संदेशवहन तसेच महत्वाच्या कामासाठीच असतो असं समीकरण होतं व ...

आठवण ...

आठवण ... आठवण आली की, आठवणींना उजाळा मिळतो, आठवणींच्या आठवणीत, माणूस खूप काही आठवतो, आठवून आठवून एकमेकांना, खूप आठवण येते, आठवणींच्या विश्वात, त्या आठवणींच्या स्वर्गात, आठवणींच्या समुद्रात, आठवणींच्या शोधात फक्त आणि फक्त त्या आठवणींसाठी आठवत आठवत तळाशी खोलवर जातो, त्यालाच आपण प्रेमाची आठवण म्हणतो.... - शंकर चव्हाण,  9921042422

जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...

Image
जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ... बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या हातात स्मार्टफोन मोबाईल आहे. त्यामुळं अगदी स्मार्ट पध्दतीनं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन अगदी सहजच गंडवलं जावू शकतं. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जरा जपूनच बरं. लॉकडाऊन काळात गेल्या अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं देशातील अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या सोबत ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल, सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणुक झाली आहे. अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा आहे. प्रथमत: कोणत्याही प्रकारचा अनोळखी फोन कॉल आला व त्यांनी सांगितलं की, मी बँकेतू बोलतोय. असं म्हटल्याबरोबर तो खरंच बँकेतूनच बोलतोय का ? याची खातरजमा करा, त्यांनी केलेला फोन क्रमांक हा खरंच बँकेचाच आहे. का ? बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या व खात्री करा किंवा त्या फसव्या असणाऱ्या फोन कॉलवर कोणी निर्बंध घालावा म्हणून संबंधीत कंपनीकडे रिपोर्ट तर केला नाही याचीही खात्री करा. हे झालं एक. आता दुसरं. हल...

अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत, सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद

Image
अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद   अंबाजोगाईचा इतिहास पाहिला तर अंबाजोगाईचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अंबाजोगाईने अनेक कलावंत घडवले आहेत. अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. अंबाजोगाई शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी तर आहेच शिवाय अंबाजोगाई कलावंतांची खान आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कलावंत अंबाजोगाईच्या खानीत नव्याने तयार होत आहेत व झालेही आहेत. तरुण पिढी ही संगीत क्षेत्राकडे वळतेय हे पाहून आपल्या भुवया नक्कीच उंचावतील व ही बाब अभिमानाची व कौतुकाची आहेच. विविध क्षेत्रातील आपापल्या जबाबदार्‍या पार पाडून हे सर्व कलावंत संगीत क्षेत्रातही आपला ठसा नव्या जोमानं उमटवत आहेत. ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. काही कलावंतांनी संगीत क्षेत्रात स्वतःला इतके वाहून घेतले आहे की, आता गाणंच त्यांचा श्वास बनला आहे. संगीत क्षेत्रातही अनेक कलावंत विविध कलागुणांनी समृध्द असल्याने त्यांचे अनेक पैलू पहावयास मिळतात. आपल्या सर्वांना वरदान ठरत असेलेली सोशल मिडीया जसं एक...

आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर, तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक

Image
आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक क्षेत्र कोणतंही असो तिथं स्पर्धा आहेच, स्पर्धेमध्ये टिकूण रहायचं म्हटलं तर तेवढं बळ, सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे असं जेव्हा ज्यांना कळतं ते स्पर्धेत टिकून राहतात आणि जिंकतातही. असंच एक उदाहरण म्हणजे ओमकार वायकर या अवलियाचं. म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसंच काहीसं करुन ओमकार यांनी एक आगळावेगळा आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं तर आहेच शिवाय आय.टी क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हे एक उत्तम प्रेरणेचा स्त्रोत ठरु शकतो. कारण असं एवढया लहान वयात असं पहिल्यांदाच झालंय असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गाव नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ओमकार विश्वास  वायकर हे नाव मुंबई नगरीमध्ये एका आयटी कंपनीत नोकरीला लागलं. त्यांनी नोकरी अगदी काही वर्षे म्हणजे अडीच वर्षे केली. नोकरी करतांना त्यांची काही तरी स्वत:चं करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांना सतत वाटायचं...

आई माझी मायेचा सागर …

Image
आई माझी मायेचा सागर … या विश्वात असं एकच न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागरं आहे, समुद्र पाहतांना डोळयाची नजर जिथवर जाईल तिथवर समुद्र दिसतो म्हणजे समुद्र आपल्या डोळयात देखील मावत नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने आपली आपल्या लेकराला जीव लावते. तिच्या जीवापेक्षाही जास्त ती आपल्या लेकरांवर प्रेम करते. तिलां असं वाटतं की, माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. मातृत्व ज्या स्त्रीला मिळालं त्या स्त्रीला जाऊन विचारा आई झाल्यावर काय समाधन मिळतं. आई होणं एवढं सोप्पं काम नाही. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई एक साक्षात्कार आहे. साक्षात परमेश्वर सुध्दा आजपर्यंत आईची जागा घेऊ शकलेला नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीवर माया, प्रेम व सांभाळ करता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. त्यामुळे प्रत्येकाला आई मिळाली. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी आईची व्याख्या लिहून होणार नाही असं हे आईचं प्रेम आहे. जे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आईची माया ही ज्याला समजली तो धन्य झाला. कारण नशिबानं ज्यांच्याकडं आई आहे ते खुप भाग्यवान आहेत. ज्याच्या...

घोटाळ्यांचा देश …

घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका !

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका ! देशाची लोकसंख्या पाहता देशात गरीबीचे सावट आहेच, शिवाय दिवसेंदिवस गोरगरीब, मध्यमवर्गीय नेहमीच कोणात्या ना कोणात्या संकटाशी सामना करत असतो, त्यांचा संघर्षही तेवढाच. गेल्या महिनाभरा पासून कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांचे भूकबळी गेले आहेत. यावर मात करत प्रत्येकजण येईल तो दिवस कसाबसा पुढे ढकलून उद्याचा दिवस नक्कीच सखुदायक होईल अशी आशा ठेवून जगत आहे. शासन देशापातळीवर, राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर, तालुकापातळीवर व गावपातळीवर कोणीही उपाशी राहू नये याासठी विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य पुरवठा करत आहे. शिवाय दानशुर व्यक्ती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, वैयक्तिक, व्यापारी व इतर निस्वार्थपणे गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. गेल्या महिनाभरापासून देशातील जनतेनं देशासाठी दिलेलं   योगदान खरंच खूप मोठं आहे. जनतेनं पुकारलेल्या एक दिवसीय बंद मुळे देशातील लॉकडाउन आजपर्यंत यशस्वी झाले व होत आहे. भाविष्यात रुग्णांची संख्या न...

मदतीला धावा रे …

Image
मदतीला धावा रे … प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार आहे. हा कोरोना कधी जाईल. कोणाला वाटतं की, मी आता घरात बसुन कंटाळलो आहे. मला घराबाहेर कधी पडता येईल. माझ्या मित्रांना, आप्तेष्ठांना, नातेवाईकांना कधी भेटता येईल. असंच बरंच काही कोणाला काही ना काही वाटत राहिल. पण शेतकऱ्याला चिंता शेतातील मालाची, नाही पिकवला तर विकणार काय ? आणि पोटाला खाणार काय ? त्यामुळे त्याला चिंता शेतातील सोनं उगऊन ते आपल्या सर्वांच्या पोटापर्यंत आणून आपण जेवण करुन तृप्त झाल्याचा ढेकर देण्यापर्यंतची संपूर्ण जबाबादरी त्या‍ बिचाऱ्याची. त्याची परिस्थिती आजही डगमगतीच आहे. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा तो देशाला जगवतोच आहे. त्याच्यासह शेतमजुर, गोरगरीब, काबाडकष्‍ट करणारांना सुध्दा तो जगवतोच आहे. त्याला दिलासा मात्र आजतागायत मिळालाच नाही. त्याला आधार कोणाचाच नाही आणि आता त्यात हे नवीन संकट. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. प्रत्येकाची दैनंदिन दिनचर्या या व्हायरसने संपूर्णत: बदलून टाकली आहे. गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. शहरातील सर्वच नागरीक आता आपापल्या गावी खेडयाकडे जात आहेत. कोरोना सारखा व्हायरस माणसाचा जीव घेत...

चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’

चायना   वाल्यांनी एवढी ‘जिरवली’,  तरीबी टिकटॉकवर चा लूय ‘ढंगाळांग मचाळांग’ असे शब्द, अशी भाषा लेखकांकडून अनपेक्षितच. किमान वाचनात अशुध्द भाषा म्हटलं की, जरा ऑड  वाटणारंच, पण काय करु. काहीजण सुधरायला तयारच नाहीत. ढंगाळांग मचाळांग म्हटलं की, थोडसं हसू आलंच असेल, वरचा मथळा वाचून थोडासा विनोद वाटलाच असेल आणि तुम्हाला थोडसं खुदकन हसायला सुध्दा आलंच अ सेल. आजचा  विषय जेवढा विनोदानं घ्यावा तेवढाच गांभिर्यानं सुध्दा. मुद्दामहुन अ सा मथळा लिहिला आहे. कारण त्याचं गांभिर्य आपल्या सर्वांना लक्षात यायला हवं. टिकटॉ कवरील नाच म्हणजेच ‘ढंगाळांग मचाळांग’. हा शब्द मराठवड्यात ओळखीचा शब्द आहे.   कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, माणूस म्हणून आपल्याला पिढ्यान-पिढ्या काही संस्कार घालून दिलेले आहेत. टिकटॉक बनवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण पाहून व त्या माध्यमातून नव्या पिढीला जो संदेश जातोय हे पाहून भविष्यात काय बरं परिणाम होतील याचे जरा जास्तच भय वाटत आहे. नौटंकी करणारे करत बसतील पण बालबुध्दीवर होणाऱ्या विपरीत परिणामाचे जास्त दु:ख वाटते. अश्लिल हावभाव, अश्लिल संवाद याम...

माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …

Image
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ?  हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय.  त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये ते...

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

Image
जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका. आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बे...

मन अस्वस्थ होतंय राव

मन अस्वस्थ होतंय राव आज खुप अस्वस्थ वाटतंय राव,  का ? कुणास ठाऊक ?  पण गुदमरल्यासारखं होतंय राव !  जणू आता सगळंच संपलंय !  मेंदू बंद पडल्यागत वाटतंय राव,  का ? कुणास ठाऊक ?  पण जीवनात कुठंतरी काहीतरी  बिनसल्यागत वाटतंय राव ! मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ...  कुणाच्या कर्माचे खापर कुणाच्या माथ्यावर ? डोळयादेखत निष्पाप जातोय सरणावर.  ज्याला त्याला आपलाच जीव प्यारा ना मोर्चा, ना दिसेना कुठेच जयघोष नारा सर्वांचा विचार आता एकच संपणार आता सगळं डोळयादेखत मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ...   निसर्गाशी स्वार्थी खेळ मांडलास तू, जसं हवं तसंच केलंस तू,  निसर्गाच्या मना विरुद्ध सारचं चालवलंस तू, अन आता का रडतोस तु ?  पशु, पक्षी मागत होते जेंव्हा तुझ्याकडे  त्यांच्या जीवाची भिक, तेंव्हा नाही वागला त्यांच्यासोबत तू नीट  आता तरी बाबा एवढयातुन काहीतरी शिक! निसर्गाच्या विरुद्ध चालणार्‍या, तुझी रे कशाला आता किव तुझ्यामुळेच जाणार आता निष्पपांचे जीव मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव.....

हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

Image
हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ... संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, हा व्हायरस आला कसा यावर चर्चा करण्यापेक्षा, आता प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची भ्रांत पडली आहे. या रोगाची सुरूवात चीन देशात झाली. वुहान शहरामध्ये या रोगाची सुरूवात झाली असून यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले. तसा तसा याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये वार्‍याच्या वेगाप्रमाणे पसरतोय व अनेकांचे जीव घेतोय. जीव गेलेल्या व्यक्तीचा देह सुध्दा पाहणं, त्यावर अंत्यसंस्कार करणं याचं सुध्दा भाग्य त्या परिवाराला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे. या महामारीमुळे संपुर्ण जगामध्ये कडेकोट बंद पाळण्यात येतोय. प्रत्येक देशामध्ये किडयामुंग्यांसारखे लोक मरत असल्यामुळे आपापल्या स्तरावर रुग्णांची काळजी घेतली जात आहे. प्रशासन आपापल्या स्तरावर नागरीकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेवून देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. जेणे करुन मृत्यूदर कमी व्हावा. त्याप्रमाणे नैतिक जबाबदारी म्हणून आपणही आपापल्या पातळीवर प्रशासनाला सहकार्य करणे कर्तव्य ...

पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?

Image
पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ? धक्काच बसला ना ? होय खरंच  असं नक्कीच झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही पीडीएफ  म्हणजे काय भानगड आहे ? होय तर, एखाद्या समस्येचं निराकरण होत नसेल तर त्याच्या मुळाशी जायला नको ? गेलंच पाहिजे ! नाही तर आपल्या बाबतीत नेमकं काय ? कुठे ? केव्हा ? कसं ? आणि का ? घडलं हे नक्की कळलंच नसतं ! हा तर   पत्रकारीतेचा नियमच आहेे. हल्ली एक पीडीएफ  नावाचं तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळं वृत्तपत्र आपल्या अगदी खिशातच येउन पोहचले आहे. म्हणजे स्मार्ट पध्दतीने स्मार्ट फोनमध्ये. कारण पीडीएफ  म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असं त्याचं विश्लेषन रुप व पीडीएफ  PDF हे त्याचं सक्षीप्त रुप आहे. आता तुम्ही म्हणाल या तंत्राज्ञानाचा आणि वृत्तपत्राचा काय संबंध ? होय नक्कीच आहे तर संबंध. त्याचं असं आहे की, हल्ली सोशल मिडीयावर व्हॉट्ट्सअ‍ॅप नावाचं एक अ‍ॅप आहे. अ‍ॅप म्हणजे एक प्रोग्राम. याच्या माध्यमातून आपण वृत्तपत्र तयार केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्राची एक  फाईल पीडीएफ  स्वरुपात वाचकांना पाठवू शकतो. म्हणजे प्रिंट व्हर्जन वेगळे आणि पीडीएफ ह...